News18 Lokmat

ठाण्यात 6 जणांकडून 25 रायफली जप्त

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Sep 14, 2014 05:22 PM IST

ठाण्यात 6 जणांकडून 25 रायफली जप्त

thane rifle 34

14 सप्टेंबर :  ठाण्यात एका भाड्याच्या खोलीत राहणार्‍या 6 जणांकडून 25 रायफली जप्त करण्यात आल्या असून या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी 6 जणांना ताब्यात घेतलं असून या 6 आरोपींना 19 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कासारवडवली येथील एका खोलीवर ठाणे पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना खोलीत 25 रायफली आढळल्या असून पोलिसांनी या रायफली जप्त केल्या आहेत. तसेच या खोलीत राहणार्‍या 6 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेले सर्व आरोपी हे जम्मू -काश्मीरमधले राहणारे असून ते एका सुरक्षा एजन्सीत कामाला होते. जप्त केलेल्या रायफलींपैकी 24 रायफली या सिंगल बोअर प्रकारच्या तर 1 रायफल डबल बोअरची आहे. अटक केलेले सहाही आरोपी गेल्या सहा महिन्यांपासून ठाण्यात भाड्याच्या खोलीत राहत असून त्यांच्याकडे रायफलीचा परवानाही नसल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 14, 2014 02:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...