लोकलचा एक डबा घसरल्याने हार्बर रेल्वे वाहतूक विस्कळीत

  • Share this:

gvf655mumbai_local

14 सप्टेंबर :  सीएसटी स्टेशनवर पनवेलला जाणार्‍या लोकलचा एक डबा घसरल्याने हार्बर रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. सुदैवाने आज सुट्टीचा दिवस असल्याने रेल्वे वाहतुकीवर याचा फार मोठा परिणाम झालेला दिसत नाही.

पनवेल- सीएसटी लोकल सीएसटी स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2वर येत असताना या गाडीचे मागचे डबे रूळावरून अचानकपणे खाली घरसले. या अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नसले तरी, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे एक आणि दोन क्रमांकाच्या फलाटावरील वाहतूक तीन क्रमांकाच्या फलाटावर वळविण्यात आली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 14, 2014 01:15 PM IST

ताज्या बातम्या