आयसिसकडून आणखी एक शिरच्छेद

आयसिसकडून आणखी एक शिरच्छेद

  • Share this:

isis execution14 सप्टेंबर : अमेरिकी पत्रकारांची हत्या केल्यानंतर 'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीया' (आयसिस) या दहशतवादी संघटनेने शनिवारी एका ब्रिटीश नागरिकाचा शिरच्छेद केल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. आयसिसकडून आतापर्यंत अशाप्रकारे शिरच्छेद करण्याचा व्हिडिओ प्रसिद्ध करण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वीही त्यांनी आशाच प्रकारे दोन अमेरिकन पत्रकारांचा निर्घृणपणे शिरच्छेद केला आहे.

या व्हिडिओच्या माध्यमातून आयसीसने पुन्हा एकदा आपला क्रूर चेहरा जगाला दाखवला आहे. डेव्हिड हेन्स या सामाजिक कार्यकर्त्याचा खून करून आयसीसीने सुमारे दोन मिनिटे 27 सेकंदांचा व्हिडिओ अपलोड केला आहे. डेव्हीड हेन्स 2013 मध्ये सिरीयातून बेपत्ता झाले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी आयसीसनं अशा प्रकारे जेम्स फॉली, स्टीव्हन सॉटलॉफ या अमेरिकन पत्रकारांचा निर्घृण शिरच्छेद केला होता. जेम्स फॉले याच्या हत्येच्या व्हिडिओमध्येच स्टीव्हनच्या हत्येची धमकी देण्यात आली होती तर स्टीव्हन सॉटलॉफ याच्या हत्येच्या व्हिडीओमध्ये ब्रिटनच्या डेव्हिड हेन्सची हत्या करण्याची धमकीही देण्यात आली होती.

डेव्हिडचा शिरच्छेद म्हणजे अमेरिकेच्या मित्र देशांना दिलेला इशारा असल्याचं आयसीसनं म्हटलं आहे.

Follow @ibnlokmattv

First published: September 14, 2014, 11:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading