म्हाडाच्या धर्तीवर स्वस्त अफोर्डेबल घरांची योजना

19 मे, सामान्य मुंबईकरांना स्वस्त घरं देऊन खरा आधार दिला तो म्हाडाने. म्हाडाच्या या स्वस्त घरांच्या योजनेचं यश पाहून नव्हे तर, रिअल्टी मार्केटचा पडता काळ बघून डेव्हलपर्सनी मंदीतही चांदी करायचं ठरवलं आणि मार्केटमध्ये अनेक बिल्डर्सनी स्वस्त अफोर्डेबल घरांच्या जाहीराती झळकावल्या आहेत.2007च्या अखेरीस रिअल इस्टेट मार्केटच्या तेजीला ब्रेक लागला. महागाई प्रमाणाबाहेर वाढत होती. लक्झरियस घरं लोकांच्या फक्त स्वप्नातच होती. कित्येक बिल्डर्सचे प्रोजेक्ट्स अपुरे पडले होते. अशातच ग्राहकांना रिअल्टी मार्केटकडे आकर्षित करण्यासाठी बिल्डर्स आणि डेव्हलपर्सनी स्वस्त घरांची नवी थीम सुरू केली आहे. डिफॉल्टर्सची संख्या वाढत असल्यामुळे बँकानी रिअल इस्टेट डेव्हलपर्सना कर्ज देणं कमी केलं होतं. लोकंही बँकाच्या महागड्या होमलोन रेटमुळे कर्ज घ्यायला कचरत होते. त्यामुळे बजेटमध्ये परवडणारी घरं अशा जाहिराती करणं ही बिल्डर्सची नवी खेळी होती. म्हाडानंही थंड पडलेल्या रिअल्टी मार्केटचा फायदा उठवत स्वस्त घरांची योजना राबवली. त्यापाठोपाठ मंत्री बिल्डर्स, हावरे ग्रुप, लोढा ग्रुप, तानाजी मालुसरे सिटीसारख्या अनेक प्रोजेक्ट्समधून ग्राहकांना स्वस्त घरांचे पर्याय मिळाले. स्वस्त घरांच्या आमिषाचा फायदा उठवण्यासाठी मोठंमोठ्या कंपन्याही मार्केटमध्ये उतरताहेत. टाटांनीही त्यांचा 4 लाखात घरं देणारा शुभ गृह प्रकल्प सुरू केलाय. ओमेक्स ग्रुपही 5 ते 10 लाखांच्या घरांच्या योजनेवर विचार करतोय. पण एकूणच ग्राहकांची खरी गरज किती पूर्ण होतेय यापेक्षा या स्वस्त घरांच्या योजनांचा बिल्डर्स आणि डेव्हलपर्सनाच जास्त फायदा होतोय हेच खरं.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 19, 2009 01:02 PM IST

ताज्या बातम्या