13 सप्टेंबर : चिल्लर च्या प्रश्नावर तोडगा शोधण्याचा प्रयत्न म्हणून जळगाव शहरातल्या एका संस्थेनं एक वेगळी मोहीम राबवली आहे. चला, चिल्लर काढू - चिल्लर देऊ या, घेऊया असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या साह्याने अभियान जळगावमधल्या एकता पतसंस्थेनं सुरू केलंय. सुमारे 4 लाख रुपयांची चिल्लर या वेळी वितरीत केली गेली. यावेळी रिझर्व्ह बँकेचे अधिकारी, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या हस्ते शहरातील लहान-मोठे व्यापारी विक्रेत्यांना प्रत्येकी 800 रुपयांची चिल्लरचे वाटप यावेळी करण्यात आले.दैनंदिन व्यवहारात सुट्या पैशांना बरंच महत्व आहे. रिझर्व्ह बँकेतर्फे दैनंदिन व्यवहारात चिल्लर पैश्यांचा तुटवडा होऊ नये म्हणून राष्ट्रीयकृत बँकांमार्फत 1 , 2, 5 रुपयांच्या नाण्यांचा सातत्याने पुरवठा केला जातो. तरी सुद्धा चिल्लर पैशांचा तुटवडाचा प्रश्न हा कायमच असतो. चिल्लर वाटणार्या या चिल्लर च्या प्रश्नावर तोडगा शोधण्याचा प्रयत्न आरबीआयच्या साह्याने जळगाव शहरातील एकता पतसंस्थेने चला, चिल्लर काढू - चिल्लर देऊ या, घेउया हे अभियान राबवून केला आहे. ग्राहक आणि दुकानदार यांच्यातला चिल्लर मुलळे होणारा दुरावा दूर करण्यासाठी आणि सुट्यापैशांचा तुटवडा कमी होऊन प्रत्येकाच्या घराघरात साचलेली चिल्लर व्यवहारात आणण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि एकता पतसंस्थेतर्फे चला, चिल्लर काढूया अभियान राबवण्यात आले. सुमारे 4 लाख रुपयांची चिल्लर या वेळी वितरीत केली गेली यावेळी रिझर्व्ह बँकेचे अधिकारी, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या हस्ते शहरातील लहान-मोठे व्यापारी विक्रेत्यांना प्रत्येकी 800 रुपयांची चिल्लर चे वाटप यावेळी करण्यात आले.दुकानदार 1 , 2, 5 रुपयांच्या सुट्ट्या पैश्यान ऐवजी नेहमीच चॉकलेट, गोळ्या, शाम्पू ची पाकीट ग्राहकांच्या हातात टिकवतात त्यामुळे व्यापारी आणी ग्राहक यांच्यात नेहमीच सुट्ट्या पैशांमुळे वाद होत असतो. पण नेहमीच सुट्या पैशांचा तुटवडा असल्याने दुकानदारालाही नाईलाजाने चिल्लर ऐवजी चोकलेट , गोळ्या , शाम्पू ची पाकीट ग्राहकांच्या हातात टिकवत असल्याचं सांगितलंया अभियांना अंतर्गत प्रत्येकाच्या घरातील पिग्मी बँक, दानपेट्या मधील चिल्लर जर व्यवहारात आणली तर हा कृत्रिमरीत्या तयार झालेला चिल्लर चा तुटवडा भविष्यात भासणार नाही यासाठी आपण हे अभियान राबवीत असल्याचे एकता रिटेलचे ललित बरडिया यांनी सांगितलं. राबविला गेलेला हा उपक्रम स्तुत्य असून समाजाला अश्या उपक्रमांची सामाजाला गरज असल्याच जिल्हाधिकारी यांनी सांगितलं.Follow @ibnlokmattv// !function(d,s,id){var js,fjsd.getElementsByTagName(s)[0],p/^http:/.test(d.location)?http:https;if(!d.getElementById(id)){jsd.createElement(s);js.idid;js.srcp://platform.twitter.com/widgets.js;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, script, twitter-wjs);// ]]>