News18 Lokmat

लक्ष्मण ढोबळेंविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 13, 2014 01:46 PM IST

लक्ष्मण ढोबळेंविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

13 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या विरोधात बोरिवली पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय.

ढोबळे यांच्याविरोधात त्यांच्याच नालंदा संस्थेतल्या एका महिला कर्मचार्‍यानं बलात्कार केल्याची तक्रार केली होती. या तक्रारीवरून शुक्रवारी मध्यरात्री हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ढोबळे यांची बोरीवलीमध्ये नालंदा नावाची संस्था आहे. या संस्थेत ही महिला काम करते. आपल्यावर 2011-13 या दरम्यान ढोबळे यांनी अनेकदा बलात्कार केला, अशी तक्रार या महिलेनं केली. मात्र ढोबळे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 13, 2014 12:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...