नव मतदारराजाच्या हाती सत्तेच्या चाव्या !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 12, 2014 11:18 PM IST

नव मतदारराजाच्या हाती सत्तेच्या चाव्या !

young voter pkgआशिष जाधव, मुंबई

12 सप्टेंबर : लोकसभा निवडणूक गाजली ती विक्रमी मतदानामुळे...लोकसभेनंतर आता विधानसभेसाठीही मतदार नोंदणीसाठीच्या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाला. लाखो मतदारांची नव्यानं नोंदणी करण्यात आलीय. या नव मतदारांच्या मतांचा मतांवर राज्यातल्या नव्या सरकारचं भवितव्य ठरणार आहे. या मतदारांचा फायदा आपल्यालाच होईल असा दावा राजकीय पक्ष करत आहेत.

मतदारांमधला उत्साह लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने राज्यात मतदार नोंदणीसाठी खास मोहिम राबवलीय. सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेला प्रचार आणि आयोगाच्या या पुढाकारामुळे गेल्या तीन महिन्यात तब्बल 38 लाख नव्या मतदारांचा यादीत समावेश झाला आहे.

वाढीव मतदार, फायदा कुणाला ?

    Loading...

  •  - लोकसभा निवडणुकीनंतर वाढलेले मतदार - 38 लाख
  •  - प्रत्येक मतदारसंघात 12 हजार ते 14 हजार वाढीव मतदार
  •  - वाढीव मतदारांचा निकालावर होणार परिणाम

लोकसभेत तरूण मतदारांनी भाजपला मतदान केल्याने विधानसभेतही महायुतीला याचा फायदा होईल असं भाजप नेत्यांना वाटतं. तर राष्ट्रवादीनेही हे मतदार आपलेच असल्याचा दावा केलाय. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 12 हजार ते 14 हजार मतं वाढली आहेत. सहसा विधानसभा मतदारसंघामध्ये विजयाचे मताधिक्य 3 हजार ते 5 हजार मतांइतकं असतं. त्यादृष्टीने विचार केला तर 38 लाख वाढीव मतदारांमुळे अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागू शकतात.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 13, 2014 08:11 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...