क्रौर्याची हद्द, अपंग महिलेवर बलात्कार

  • Share this:

rape sds12 सप्टेंबर : बलात्काराच्या घटना राज्यातल्या विविध जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहेत. आरोपींच्या तावडीतून आता वृद्ध आणि अपंग महिलाही सुरक्षित नाहीत. लातूर जिल्ह्यातल्या कोपरा या गावात एका नराधमानं दोन्ही पायाने अपंग असलेल्या महिलेवर पाशवी बलात्कार केलाय. बलात्कारानंतर या महिलेला रॉकेल टाकून जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला. फरार झालेल्या नराधमाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे.

लातूर जिल्ह्यातल्या या कोपरा गावात समाजाला काळिमा फासणारी घटना घडलीय. दोन्ही पायाने अपंग असलेल्या महिलेच्या असाह्यतेचा फायदा घेऊन तिच्यावर या नराधमाने बलात्कार केलाय. पीडित महिला जागेवरून हालचालही करू शकत नाही, ती दोन्ही पायाने अपंग आहे. बलात्कार करणार्‍या या नराधमाला तिच्या अपंगत्वाची देखील कीव आली नाही. महिला घरात एकटी असल्याचे पाहून, पीडितेचे हातपाय आणि तोंड बांधुन नराधमाने तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर पीडितेला रॉकेल टाकून जाळण्याचाही आरोपीने प्रयत्न केलाय.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या बलात्कारी नराधमाला पोलिसांनी परळी येथून अटक केलीय. बलात्कारानंतर हा नराधम फरार झाला होता. अपंग महिलेवरच्या बलात्काराने समाजात हळहळ व्यक्त करण्यात येतेय. तर अपंगांमध्ये या घटनेने दहशत निर्माण केलीय. अश्eा घटना घडू नयेत यासाठी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी अपंगांच्या संघटनेने केली आहे.

Follow @ibnlokmattv

First published: September 12, 2014, 6:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading