अमळनेरमध्ये पाण्यावरून दंगल, महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

अमळनेरमध्ये पाण्यावरून दंगल, महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

  • Share this:

amlaner riots12 सप्टेंबर : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात वासरे गावामध्ये पाण्यावरून 2 गटांत दंगल झाली आणि त्यातून एका महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झालाय. ही महिला सुखरूप आहे. समाजकंटक एवढ्यावरच थांबले नाहीतर एक प्रसुती झालेल्या महिलेलाही मारहाण केली.

या दंगलीत 15 जण जखमी झाले आहेत. यातल्या 6 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या दंगलप्रकरणी वासरे गावातल्या 35 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 6 जणांना ताब्यात घेण्यात आलंय.

जळगाव जिल्ह्यातील अंमळनेरच्या वासरे गावात 9 तारखेला पाण्याच्या वादावरून ग्रामपंचायत सदस्याला मारहाण झाली होती. त्या प्रकरणी 26 लोकांवर गुन्हे दाखल झाले होते त्यांना कोर्टाने जामिनही दिला होता.

आज सकाळी फिर्यादी पक्षाने या आरोपींच्या घरी जाऊन लाथा बुक्क्यांनी, लाठ्या काठ्यांनी, तुडुंब मारहाण केली त्यात महिलेला रॉकेल टाकून पेटविण्याचा प्रयत्न केला गेला तर नुकतीच प्रसुती झालेल्या महिलेलाही मारहाण झाली.

दंगलीमुळे गावाला छावणीच स्वरूप आलंय. या प्रकरणी पोलिसांनी गावातील 35 लोकांवर 307 आणि मुंबई कायदा कलम 135 नुसार गुन्हे दाखल केले असून 6 आरोपींना ताब्यातही घेतले आहे. वासरे गावात आता बंदोबस्त वाढवण्यात आलाय त्यामुळे गावाला आता छावणीचं स्वरूप आलंय.

Follow @ibnlokmattv

First published: September 12, 2014, 3:18 PM IST

ताज्या बातम्या