आघाडीच्या मदतीने मनसेने नाशिकचा गड राखला

आघाडीच्या मदतीने मनसेने नाशिकचा गड राखला

  • Share this:

Nashik mayor

12 सप्टेंबर :  नाशिकच्या महापौरपदाच्या निवडणुकीत सत्तेचा एक नवा पॅटर्न पहायला मिळाला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने नाशिकच्या महापौरपदी मनसेचे नगरसेवक अशोक मुर्तडक यांची निवड झाली आहे तर उपमहापौरपदी अपक्ष गुरमीत बग्गा यांची निवड झाली आहे. अशोक मुर्तडक यांना 75 मतं मिळाली आहेत तर त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या शिवसेनेच्या सुधाकर बडगुजर यांना 44 मतं मिळाली आहेत.

मनसेचा महापौर असावा यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं मनसेला बाहेरून पाठिंबा दिला आहे. शिवसेना-भाजपा महायुतीला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मनसे हे तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. मनसेच्या आणि काँग्रेसच्या प्रत्येकी दोन फुटीर नगरसेवकांनी शिवसेनेला मतदान केलं आहे. या मतदानात माकपच्या दोन तर जनराज्य पक्षाच्या एका असे तीन नगरसेवक तटस्थ होते. सत्तेच्या या नव्या नाशिक पॅटर्नमुळे विधानसभा निवडणुकांसाठीही नवे संकेत मिळाल्याचं मानलं जातं आहे.

दरम्यान, शिवसेना-भाजप यांच्या युतीला शह देण्यासाठी आम्ही मनसेला पाठिंबा दिला असल्याची प्रतिक्रिया राज्याचे बांधकाम आणि विकासमंत्री छगन भुजबळांनी दिली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 12, 2014 01:21 PM IST

ताज्या बातम्या