जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये खलबत

जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये खलबत

  • Share this:

BJP And Shivsena

12  सप्टेंबर :  विधानसभा निवडणुकीत निम्म्या जागांसाठी आग्रही असणार्‍या भाजपला 7 ते 8 वाढीव जागा दिल्या जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विधानसभेच्या जागावाटपावरून महायुतीचे प्रमुख पक्ष असलेल्या या दोन्ही पक्षांमधले मतभेद भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या भेटीनंतर कमी झाला. पण दोन्ही पक्षांमधला संख्याबळाचा तिढा अजून कायम आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यात काल (गुरूवारी) 'मातोश्री'वर झालेल्या बैठकीतून काही तोडगा निघू शकलेला नाही.

गेल्या दीड महिन्यापासून महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेला सुरवात झाली. नव्याने आलेल्या मित्रपक्षांचं जागावाटप जवळजवळ निश्चित झाल्यानंतर, आता शिवसेना आणि भाजप यांच्यातल्या जागावाटपावरून खलबतं सुरू आहे. विधानसभेच्या 288 जागांपैकी शिवसेनेकडे 169 आणि भाजपकडे 119 जागा असा फॉर्म्युला होता, पण येत्या विधानसभा निवडणुकीत हा फॉर्म्युला लागू होणार नाही असं सांगत भाजपने गेल्यावेळी पेक्षा 15 वाढीव जागांची मागणी केली आहे.

भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये काल (गुरूवारी) रात्री जागावाटपाविषयी बैठक झाली. त्यात काहीच तोगडा निघू शकला नाही. आतापर्यंत शिवसेनेने भाजपला महाराष्ट्रात लहान भावाची वागणूक दिली आहे. शिवसेना आणि भाजपने निम्म्या-निम्म्या जागा लढवाव्या, अशी भाजपची मागणी आहे. पण, भाजपला 7 ते 8 वाढीव जागा देऊन त्यांची बोळवण केली जाण्याची शक्यता आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 12, 2014 09:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading