नाशिकच्या महापौरपदासाठी मनसे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र

नाशिकच्या महापौरपदासाठी मनसे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र

  • Share this:

Sharad Pawar And Raj thakre

12 सप्टेंबर :  नाशिकचा महापौर कोण होणार, हे आता काही तासांतच स्पष्ट होणार आहे. पण, या महापौरपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मनसे एकत्र आले आहेत. पण अजूनही अपक्षांनी भूमिका जाहीर केलेली नाही.

मनसे आणि भाजपा युती तुटल्यानंतर नाशिकमध्ये आता महापौर निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मनसे यांची गट्टी झाली आहे. शिवसेना-भाजपा महायुतीला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी हे तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. दरम्यान, नाशिकचा महापौर राष्ट्रवादीचाच व्हावा यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक झाली. संख्याबळ जमवण्याच्या दृष्टीनं या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला अपक्ष नेतेही उपस्थित होते. पण अजूनही अपक्षांनी भूमिका जाहीर केलेली नाही. काँग्रेसच्या तीन नगरसेवकांची भूमिका तळ्यात-मळ्यात आहे.

दरम्यान मनसेच्या इच्छुकांना पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी सबुरीचा सल्ला दिला आहे. मनसे आणि राष्ट्रवादीचं संख्याबळ सर्वात जास्त होत असलं तरी ज्या भुजबळांच्या विरोधात आतापर्यंत भूमिका घेत राहिलो त्यांच्यासोबत सत्तेत बसायचं का असा पेच सध्या मनसेपुढे आहे. दरम्यान शिवसेनेतसुद्धा इतर पक्षातले जास्तीत जास्त नगरसेवक आपल्या बाजुने वळवण्यासाठी जोरात हालचाली सुरू आहेत.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 12, 2014 09:03 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...