राज्यभरात डेंग्यूचं थैमान

  • Share this:

dengu

11 सप्टेंबर : राज्यात डेंग्यूची साथ पसरतच चालली आहे. पुणे शहरात दर दिवशी 50 ते 60 डेंग्युचे रूग्ण आढळून आले आहेत, तर मुंबईत 88 डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यात आतापर्यंत तीन रूग्णांचा डेंग्युमुळे मृत्यू झाला आहे. पावसाच्या विश्रांतीमुळे डेंग्युच्या डासांची उत्पत्तीही वाढत चालली आहे आणि त्यातच महापालिकेने हलगर्जीपणा केला आहे. ऑगस्ट महिन्यात डेंग्युची लागण झालेले सर्वाधिक म्हणजे 591 रूग्ण आढळले आहेत. महापालिकेने याबद्दल साडेतीन महिन्यांत 1300 जणांना नोटीस बजावली आहेत. धनकवडी, कर्वेनगर, येरवडा, हडपसर, भवानी पेठ आणि घोले रोड परिसरात सर्वाधीक डेंगीचा सार्वाधीक प्रभाव आहे.

तर विदर्भातही अशीच काही परिस्थीती पाहायला मिळली. विदर्भात आतापर्यंत 68 डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आले आहेत तर आरोग्य विभागाच्या माहितीनुसार यावर्षी विदर्भात पाच जणांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे . नागपूरच्या महापौरांनी तर डेंग्यूमुळे कुणाचा मृत्यू झाला तर त्यासाठी संबधित जबाबदारी असलेल्या कर्मचार्‍याला दोषी धरून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाईल असा फरमानचं काढला आहे. शहरातल्या अनेक भागात रिकाम्या प्लॉट्सवर पाणी साचल्यामुळे डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे अशा ठिकाणी स्वच्छता करण्याची मोहिम सुद्धा राबवण्यात येणार आहे. औरंगाबादमध्येही डेंग्यूने थैमान घातलं आहे. आतापर्यंत 13 जणांचा बळी डेंग्यूमुळे गेला आहे तर 300 जणांची डेंग्यूसदृश रुग्ण म्हणून नोंद करण्यात आली आहे. तर 22 जणांची डेंग्यूची तपासणी पॉझिटिव्ह आलेली आहे.

डेंग्यूचं थैमान

  • औरंगाबाद

डेंग्यूचे बळी - 13

डेंग्यूचे रुग्ण - 22

  • विदर्भ

डेंग्यूचे बळी - 5

डेंग्यूसदृश रुग्ण - 68

  • पुणे

डेंग्यूचे वर्षभरात 3 बळी

10 स्पटेंबरपर्यंत 1,972 डेंग्यूचे रुग्ण

  • मुंबई

डेंग्यूसदृश रुग्ण - 88

 

  • नाशिक

डेंग्यूचा बळी - 1

  • रत्नागिरी

डेंग्यूचे रुग्ण- 48

  • सातारा

डेंग्यूचे बळी -1

डेंग्यूचे रुग्ण - 21

Follow @ibnlokmattv

First published: September 11, 2014, 4:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading