Elec-widget

आयसीसला पूर्णपणे नष्ट करणार -ओबामा

आयसीसला पूर्णपणे नष्ट करणार -ओबामा

  • Share this:

131031_barack_obama_flags_ap_605

11 सप्टेंबर : अमेरिकेला धमकी देणार्‍या दहशतवाद्यांची ताकद कमी करून, शेवटी आयसीसला पूर्णपणे नष्ट करणार, अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केली. अमेरिकेच्या इराक आणि सीरियात ठराविक ठिकाणी हवाई हल्ले करून आयएसआयएसच्या दहशतवाद्यांना संपवणारच असेही ओबामा यांनी म्हटलं आहे. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी  दहशतवादविरोधी मोहिमेची रणनीती जाहीर केली. आयसीस या दहशतवादी संघटनेपासून अमेरिकेसह संपूर्ण जगाला धोका आहे. अमेरिका ही संघटना नष्ट करण्यासाठी पुढाकार घेतच राहणार, असं ओबामा यांनी स्पष्ट केलं आहे. तसचं अमेरिकी सैन्य यावेळेस इराक किंवा सीरियात घुसणार नाही असंही त्यांनी यावेळेस स्पष्ट केलं आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 11, 2014 12:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...