मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत

  • Share this:

gvf655mumbai_local

गेल्या काही दिवसांपासून वारंवार तांत्रिक बिघाडांमुळे होणारा मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा आज गुरूवारी सकाळी पुन्हा एकदा अनुभवण्याला मिळाला. मध्य रेल्वेच्या शहाड आणि कल्याण या स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मुंबईकडे जाणार्‍या वाहतुकीची कोंडी झाली. रेल्वेच्या गाड्या 15 ते 20 मिनिटे उशीराने धावत आहेत. त्यामुळे ऐन ऑफिसला जाण्याच्यावेळी मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांत रूळाला तडे जाणे, ओव्हरहेड वायर तुटणे अशा काही कारणांमुळे मध्य रेल्वे अनेकदा विस्कळीत झाली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 11, 2014 11:36 AM IST

ताज्या बातम्या