कोलकाता नाईट रायडर्सची लढाई प्रतिष्ठेसाठी

18 मे,आयपीएलमध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातली मॅच प्रिटोरीया इथे रंगणार आहे. नाईट रायडर्स आधीच स्पर्धेतून बाहेर गेले असल्यामुळे त्यांच्यासाठी ही मॅच प्रतिष्ठेची ठरणार आहे. तर चेन्नईला ही मॅच जिंकून सेमी फायनलमधलं आपलं स्थान अधिक भक्कम करण्याचे वेध लागले आहेत. क्रिकेट कधी कधी निर्दयी होतं... कोलकाता नाईट रायडर्सना हा खेळ किती निर्दयी असू शकतो याची पूर्ण कल्पना आहे. शनिवारी पंजाब किंग्ज इलेवनबरोबर खेळताना विजयाचा घास त्यांच्या हातातून अखेर निसटलाच... ते पुन्हा एकदा विजयाला मुकले. ते जितके रोहित शर्मामुळे हरले तितकेच ते स्वतःचा आत्मविश्वास नसल्यामुळे हरले. पण कसंही करून त्यांना पुन्हा एकदा मैदानावर उतरावं लागणार आहे. मॅच जिंकू शकतो हे दाखवण्याची आता त्यांना चेन्नईविरुध्द शेवटची संधी आहे. चेन्नईची टीमचा फॉर्म चांगला पण चेन्नईला खराब फिल्डींगची चिंता आहे.चेन्नईलाही बरे वाईट दिवस बघावे लागलेच. पण सेमी फायनलची जागा त्यांनी पक्की केली आहे. 7 विजयासह सुपर किंग्ज सेमी फायनलमध्ये आता विजेतेपदाचे दावेदार म्हणूनच उतरतील.चांगली बॅटींग, अचूक बॉलींग आणि एकूणच चांगल्या फॉर्ममधली टीम घेऊन उतरणार्‍या धोणीला सेमी फायनलमध्ये विजयी कामगिरी करतच उतरायला आवडेल. पण फिल्डींगमधलं ढिसाळपणाचं भूत कॅप्टनला सतावत असणार हे नक्की.त्यामुळे या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सची लढाई आहे ती प्रतिष्ठा आणि वर्चस्वाची.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 18, 2009 04:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading