महाराष्ट्रात येत्या 3 दिवसांत अतिवृष्टीचा इशारा

महाराष्ट्रात येत्या 3 दिवसांत अतिवृष्टीचा इशारा

  • Share this:

heavy rainfall09 सप्टेंबर : दडी मारुन बसलेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार 'कमबॅक' केलंय. पुढच्या तीन दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय.

पुढच्या दोन दिवसांत विदर्भ आणि मराठवाड्याला जोरदार पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोव्यालाही अतिवृष्टीचा इशारा तडाखा बसू शकतो असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.

खबरदारी म्हणून केंद्र सरकारने रेड ऍलर्ट जारी करण्यात आलाय. दरम्यान, जळगाव, गडचिरोली, विदर्भाला पावसाने झोडपून काढले आहे. जळगावमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झालीये. तर गडचिरोलीतही पावसाने धूमशान घातले आहे.

Follow @ibnlokmattv

First Published: Sep 9, 2014 05:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading