नाशिकमध्ये भाजपची मनसेशी काडीमोड, युती एकत्र

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 9, 2014 04:58 PM IST

nashik palika_new09 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाजपने मनसेशी काडीमोड घेतलाय आणि शिवसेनेशी हातमिळवणी केलीय. सेना-भाजपच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी करत महापौर-उपमहापौरपदाचे उमेदवार अर्ज भरण्यासाठी पालिकेत दाखल झाले आहे.

नाशिकच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. नाशिकचा महापौर होण्यासाठी मोठी शर्यत सुरू झालीये. युती, आघाडी, पक्ष आणि विचार हे सारं धाब्यावर बसवून थेट व्यवहारीक पातळीवर ही निवडणूक उतरलीय. 63 या जादुई आकड्यापर्यंत एकही पक्ष पोहोचत नाहीय. त्यामुळे घोडेबाजार तेजीत आहे, असा आरोप अपक्ष गटाकडून केला जातोय. आजपासून उमेदवारी अर्ज भरले जात असले तरी शेवटच्या क्षणापर्यंत नाट्यमयता कायम आहे. दुपारी 12 पर्यंत 8 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. तर सत्ताधारी मनसेच्या उमेदवारांनी स्वतंत्रपणे अर्ज भरले आहे. नाशिकमध्ये 12 सप्टेंबर रोजी महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक होणार आहे. नाशिक महापालिकेत भाजपच्या पाठिंब्याच्या जोरावर मनसेने सत्ता स्थापन केली होती. विशेष म्हणजे नाशिक पालिकेत मनसेची एकमेव सत्ता आहे. भाजपने साथ सोडल्यामुळे मनसेची चांगलीच कोंडी झालीये. त्यामुळे नाशिकमध्ये महापौरपदाच्या निवडणुकीत सर्व समीकरणं बदलली आहेत.

नाशिक महापौरपदाचा तिढा

  • - निर्णायक बहुमताचा अभाव
  • Loading...

  • - घोडेबाजाराला ऊत
  • - राष्ट्रवादी मनसे एकत्र येणार का?
  • - भाजप मनसेची साथ सोडणार का?
  • - शिवसेना भाजप एकत्र येणार का?
  • - काँग्रेस आणि अपक्ष काय कौल देणार?

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 9, 2014 04:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...