शिवसेनेच्या स्नेहल आंबेकर मुंबईच्या नव्या महापौर

शिवसेनेच्या स्नेहल आंबेकर मुंबईच्या नव्या महापौर

  • Share this:

snehal ambekar_mumbai_mayor309 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं बाजी मारलीये. सेनेच्या नगरसेविका स्नेहल आंबेकर मुंबईच्या नव्या महापौर झाल्या आहेत. मुंबईच्या महापौरपदी पहिल्यांदाच महापौर म्हणून दलित चेहरा मिळाला आहे. तर उपमहापौरपदी भाजपच्या अलका केरकर विजयी झाल्या आहेत.

विद्यमान महापौर सुनील प्रभू यांचा कार्यकाळ आज 8 सप्टेंबर रोजी संपलाय. त्यामुळे नव्या महापौरदपासाठी निवडणूक झाली. काँग्रेसच्या प्रियतमा सावंत यांचा त्यांनी 57 मतांनी पराभव केला. आंबेकरांना 121 मतं मिळाली.

आज झालेल्या निवडणुकीत एकूण 185 नगरसेवकांनी मतदान केलं. तर 19 नगरसेवक गैरहजर होते.

दरम्यान, उपमहापौरपदाच्या निवडणूक सुरू असतानाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सभागृहात आले असता. त्यांना विरोधकांनी आक्षेप घेतल्यानं काही काळ गोंधळ उडाला.

आंबेकर या 2012 साली पहिल्यांदाच नगरसेविका झाल्या आणि आता दोनच वर्षांनी त्यांना महापौरपदाचा मान मिळालाय. त्या मुंबईच्या लोअर परेल भागातल्या वॉर्ड क्रमांक 194 मधून नगरसेवक आहेत. तर उपमहापौरपदाची माळ भाजपच्या नगरसेविका अलका केरकर यांच्या गळ्यात पडली.  अलका केरकर 121 मतांनी विजयी झाल्या आहेत.

Follow @ibnlokmattv

First published: September 9, 2014, 4:05 PM IST

ताज्या बातम्या