लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप

लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप

  • Share this:

LalBaugcha Raja

09 सप्टेंबर : मुंबईत नवसाला पावणारा आणि आपल्या सर्वांचाच लाडका असलेल्या लालबागच्या राजाचं आज सकाळी साडेआठच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आलं. आपल्या लाडक्या बाप्पाला शेवटचा निरोप देण्यासाठी 'पुढच्या वर्षी लवकर या' आशा जयघोषात भाविकांनी गिरगाव चौपाटीवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

लालबागच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक काल (सोमवारी) सकाळी 9 वाजता सुरू झाली होती आणि तब्बल 21 तासानंतर आज (मंगळवारी) पहाटे ही मिरवणूक जल्लोषात गिरगाव चौपाटीवर पोहोचली. चौपाटीवर पोचल्यावर राजाची सकाळी उत्तरआरती करण्यात आली आहे. त्यानंतर लाकडी तराफ्यावरून लालबागच्या राजाला खोल समुद्रात नेण्यात आलं. राजाचं विसर्जन करण्याचा मान हा कोळी बांधवांचा असतो. होड्यांनी राजाच्या तराफ्या भोवती फेर धरून राजाला सलामी देण्यात आली आणि त्यानंतर विसर्जन करण्यात आलं. विसर्जनाच्या काळात संपूर्ण शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. जवळपास 50 हजार पोलिस कर्मचारी यावेळी तैनात होते.

Follow @ibnlokmattv

First published: September 9, 2014, 10:43 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading