बाप्पाच्या विसर्जनासाठी कडेकोट बंदोबस्त

बाप्पाच्या विसर्जनासाठी कडेकोट बंदोबस्त

  • Share this:

B_Id_417999_Ganesh_Chaturthi

08 सप्टेंबर :  आज अनंत चतुर्दशी... गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला असं म्हणत लाडक्या गणरायाला निरोप वेळ आता जवळ येऊ लागली आहे. आजच्या विसर्जनासाठी गणेश मंडळांसह शहरभरातल्या मुंबईतल्या सर्व चौपाट्यांवर पोलीस, आरपीएफ, बीएसएफच्या तुकड्या सज्ज झाले आहेत.

गणेश विसर्जन होणार्‍या सर्व चौपाट्यांवर सुरक्षेच्या कारणास्तव सीसीटीव्ही कॅमेर्‍याचा वॉच ठेवण्यात येणार आहे. 11 दिवसांपासून भक्तांच्या भेटीला आलेले बाप्पा आपला निरोप घेणार आहेत. बाप्पांच्या विसर्जनसाठी मुंबई महापालिका, अग्निशमन दल आणि मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत.

आज होणार्‍या गणपती विसर्जनासाठी,  47 हजार पोलीस तर एकूण बंदोबस्ताच्या 10 टक्के पोलीस साध्या वेषात तैनात असणार आहेत. गिरगाव, दादर, जुहू या चौपाट्यांवर विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय एसआरपीएफच्या 10 तुकड्या, बीएसएफच्या 2 तुकड्या आणि 10 हजार 500 स्वयंसेवक अशा तगड्या बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे.

गणेश विसर्जनादरम्यान कोणतेही 'विघ्न' आड येऊ नये म्हणून सर्वप्रकारचे खबरदारी घेण्यात येणार असल्याचे मुंबई पोलिसांच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबईतील पोलीस बंदोबस्त

  • विसर्जनाची ठिकाणे - 88
  • मुंबई पोलीस - 47 हजार
  • एसआरपीएफ - 10 तुकड्या
  • बीएसएफ - 2 तुकड्या
  • एनजीओ, एनसीसी, एनएसएस- 10 हजार500 कार्यकर्ते
  • साध्या वेशातले पोलीस - 10 टक्के
  • जलसुरक्षा दल - 500 स्वयंसेवक
  • हॅम रेडिओ - 35 स्वयंसेवक

Follow @ibnlokmattv

First published: September 8, 2014, 9:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading