हिंगोलीत डेंग्यूची साथ, उपचाराअभावी चिमुरड्यांचा मृत्यू

  • Share this:

dengu05 सप्टेंबर : हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यात मागील आठ दिवसांपासून डेंग्यूची साथ सुरू असून, यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी उपचारापूर्वीच मरण पावला. तर त्याच शाळेतील आणखी दोन विद्यार्थी आणि गावातील इतरांना तापाची लागण झाली असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परंतु गावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी कर्मचारीच नसल्याचं समोर आलंय.

हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी हे एक आदिवासीबहुल गाव असून, या ठिकाणी जि.प.प्राथमिक या शाळेमध्ये

इयत्ता तिसरीमध्ये शिक्षण घेत असलेला संदेश पुंडगे यास अचानक ताप आल्याने त्याला उपचारासाठी रूग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. संदेशच्या अचानक जाण्याने त्याच्या पालकावर मोठा आघात झाला आहे. डोळ्यात अश्रू असलेल्या संदेश च्या वडिलांनी आमच्याकडे प्रतिक्रिया देताना सांगितले की, संदेश ला अचानक ताप आला आम्ही त्याला खासगी शाळेत दाखवले डॉक्टरांनी त्याला हिंगोली नेण्यास सांगितले. हिंगोलीत नेताना रस्त्यातच त्याचा दुर्देवी अंत झाला. पिंपळदरी येथे असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात संदेश ला का नाही दाखवले असा प्रश्न त्यांना केला असता त्यांनी सांगितले, आरोग्य केंद्रात कोणीच राहत नाही तर जाऊन दाखवणार कोणाला ? पिंपळदरी च्या प्राथमिक केंद्रात कोणी राहिले असते तर कदाचित संदेश चे प्राण वाचले असते.

संदेश शिवाय गावातील याच वर्गातील विकास डुकरे, प्रतीक्षा संजय घोंगडे यांना देखील ताप आली. या तिघांना खासगी रुग्णालयात

दाखल केल्यावर पालकांनी मुलांच्या रक्तांची तपासणी केली असता, त्यांना डेंग्यूचा ताप असल्याचे निष्पन्न झाले. वेळीच उपचार मिळाल्याने यांचे प्राण वाचले . पिंपळदरी मध्ये चालू असलेल्या तापाच्या साथ विषयी आम्ही तालुका आरोग्य अधिकारी अविनाश गायकवाड यांची प्रतिक्रिया घेतली गावातील जवळपास 15 जणांचे रक्ताचे नमुने घेऊन तपासणी साठी पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले. गावात असलेल्या तापाची साथ लक्षात घेता वैद्यकीय पथकाला मुख्यालयात राहण्याची ताकीद दिले असल्याचे सांगितले.

मात्र आम्ही जेव्हा पिंपळदरी प्राथमिक आरोग्य केंद्रात गेलो असता तिथे पथक तर सोडाच कर्मचारी सुद्धा हजर नव्हते. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, यासह फक्त 4 कर्मचारी होते. येणार्‍या तापाच्या रुग्णांना परिचारिका तपासून औषध देत होती. डॉक्टरांचे निवास स्थान ओस पडले होते. या मध्ये कोणीही राहत नसल्याचे आढळून आल . वास्तविक कर्मचार्‍यांना मुख्यालय सोडून कुठेही जाता येत नाही. मोठी साथ सुरू असताना ताकीद दिल्यानंतर ही डॉक्टर उपस्थित नसल्याने गावकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली .

एकीकडे तापाच्या साथीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वेग वेगळ्या उपाययोजना करत असल्याचे सांगून वैद्यकीय पथक रुग्णावर उपचार करत असल्याचे अधिकारी सांगत आहे तर दुसरीकडे मात्र प्राथमिक केंद्रात कोणीच राहत नसल्याचे आढळून आले. वैद्यकीय कर्मचारी आणि अधिकार्‍यांच्या गलथान कारभारामुळे एका चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागल्यानंतर ही इतरांचे उपचार करण्यासाठी कोणीही

उपस्थित नाही ही एक शोकांतिकच म्हणावी लागेल. वेदनारहित झालेल्या आरोग्य विभागाला जाग तरी कधी येणार असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 5, 2014 01:01 PM IST

ताज्या बातम्या