04 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये महापौरपदाच्या हालचालींना वेग आला आहे. नगरसेवकांची पळवापळवी रोखण्यासाठी मनसेनं चांगलीच 'फिल्डिंग' लावली होती मात्र तरीही 2 नगरसेवक गायब झाले आहे. 2 नगरसेवक विरोधकांच्या गळाला लागले असल्याची शक्यता आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्येही फूट पडली आहे.
नाशिक महापालिकेच्या महापौरपदावर भाजपने दावा सांगितलाय. गेल्या वेळी आम्ही मनसेला पाठिंबा दिला, आता मनसेनं आम्हाला पाठिंबा द्यावा अशी मागणी भाजपनं केलीय. किंबहुना त्यासाठी भाजप मनसे आणि शिवसेना दोघांसोबत चर्चा करतेय. त्यामुळे नाशिकच्या महापौरपदी मनसे, शिवसेना आणि भाजप या तिघांमध्ये चुरस आहे. विशेष महापौरपदासाठी आवश्यक म्हणजे 63 या निर्णयक आकड्यापर्यंत कोणताच पक्ष एकटा पोहोचत नाही. सर्वांची गोळाबेरीज 40 ते 45 पर्यंत जातेय. त्यामुळे नाशिकमध्ये तोडफोडीच्या राजकारणाला वेग आलाय. काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये फूट पडलीय. तर मनसेचे दोन नगरसेवक गायब आहेत. बाकीचे नगरसेवक आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेणार आहेत. तर महापौरपदाच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजपची उद्या बैठक होणार आहे. विशेष म्हणजे आपले नगरसेवक फूट नये म्हणून मनसेनं अगोदर टूर काढून सर्वांना अज्ञातस्थळी हलवलं होतं.
Follow @ibnlokmattv |