रामदास आठवलेंसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच
17 मे आरपीआयचे नेते रामदास आठवले यांना आपल्यापक्षाकडे खेचण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. आयबीएन लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीने रामदास आठवलेंना राज्यसभेवर पाठवण्याची तयारीही सुरू केली आहे. पण आरपीआय नेते रामदास आठवले यांचा शिर्डीतून पराभव झाला असल्यामुळे राष्ट्रवादी-काँग्रेसची ही नवी खेळी असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादीचे राज्यसभेचे खासदार वाय.पी. त्रिवेदी यांची टर्म येत्या जूनमध्ये संपत आहे. शिवाय राज्यसभेवरच असलेल्या सुप्रिया सुळेही लोकसभेवर गेल्यामुळे त्यांची एक जागा रिकामी होईल. या जागेवर पाठवून काँग्रेसला रिपब्लिकन राजकारण्याच्या कोंडीत अडकवण्याचा डाव राष्ट्रवादी खेळेल अशी चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसने आठवलेंना राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद देण्याची योजना आखल्याचं समजत आहे.

First published:
May 17, 2009, 6:56 AM IST
Tags: