सेनेचं 'ई-व्हिजन', विद्यार्थांना देणार टॅब!

सेनेचं 'ई-व्हिजन', विद्यार्थांना देणार टॅब!

  • Share this:

Uddhav E-Vission

04 सप्टेंबर :  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या व्हिजन डॉक्युमेंटचं पुढचं पाऊल टाकलंय. यावेळ त्यांनी शालेय विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. यावेळी विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझं कमी करण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला असून, आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण अभ्यासक्रम ई-शिक्षण पद्धतीने शिकवणारे मायक्रो एसडी कार्ड तयार केले आहे. हे कार्ड एका टॅबच्या माध्यामातून पालिका , महापालिका आणि जिल्हापरिषेदच्या शाळांना म्हजेच प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत देण्यात येणार असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईत केली. राज्यात महायुतीची सत्ता आल्यास ही कार्ड आणि टॅब मोफत वाटली जातील, असं ते म्हणाले.

विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी विशेष अभ्यासक्रमाची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे असंही ते म्हणाले. सध्या मराठी आणि इंग्रजी माध्यमातून शिकणार्‍या विद्यार्थ्यांना या टॅबचा उपयोग होईल. मात्र, लवकरच सर्व भाषांमध्ये हा टॅब उपलब्ध करून देण्यात येईल. तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी सोलार चार्जिंगवर चालणारे टॅब उपलब्ध करून देण्यात येतील असही उद्धव ठाकरे म्हणाले. एवढ्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जनतेचं आयुष्य बदलायचं आहे, महाराष्ट्र बदलायचा आहे असं म्हणत येत्या चार- पाच दिवसात आणखीन नवा उपक्रम आणणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तर IAS, IPS च्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या मदतीने मार्गदर्शन करण्यात येईल. याचा लाभ राज्यभरातील नऊ सेंटरमधून पाचशे विद्यार्थ्यांना घेता येईल.

Follow @ibnlokmattv

First published: September 4, 2014, 1:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading