'अल कायदा'नं भारतात प्रवेश केल्याचा दावा ?

'अल कायदा'नं भारतात प्रवेश केल्याचा दावा ?

  • Share this:

Ayman-al-Zawahiri

04 सप्टेंबर :  'अल कायदा' या दहशतवादी संघटनेची नजर आता भारतावर असून भारतीय उपखंडात या संघटनेची नवीन शाखा सुरू करत असल्याची घोषणा 'अल-कायदा'चे प्रमुख अयमान अल जवाहिरी याने केली आहे. या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी देशभरात दक्षतेचा इशारा दिला आहे. अल कायदानं एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओचा तपास करण्याचे आदेश गृहमंत्रालयाने गुप्तचर संस्थांना दिले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ खरा असल्याचं गुप्तचर यंत्रणांनी म्हटलं आहे.

भारतीय उपखंडात अल कायदाची शाखा स्थापन होणं ही बर्मा, बांगलादेश, आसाम, गुजरात, अहमदाबाद आणि काश्मीरमधील मुस्लिमांकरता चांगली बातमी असल्याचे त्याने म्हटलं आहे. 'ही शाखा मुस्लिमांना अन्याय आणि अत्याचारांपासून वाचवण्याचं काम करेल असं जवाहिरी याने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, व्हिडिओतून अल कायदासाठी तरुणांची भरती करण्याचा अल जवाहिरीचा हेतू असून सध्या अल कायदाचा भारतात तळ नसल्याचं गुप्तचर यंत्रणांनी स्पष्ट केलं आहे. या पार्श्वभूमीवर सध्या गृहखात्याची महत्त्वाची बैठक सुरू आहे.

Follow @ibnlokmattv

First published: September 4, 2014, 12:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading