...आणि स्वप्नाली घरी परतली

...आणि स्वप्नाली घरी परतली

  • Share this:

03 सप्टेंबर : मृत्यूशी झुंज देऊन स्वप्नाली लाड आज आपल्या घरी पोहचलीये. धावत्या रिक्षातून उडी मारल्यामुळे स्वप्नाली गंभीर जखमी झाली होती. तब्बल महिनाभर मुत्यूशी झुंज देणार्‍या स्वप्नालीला डिस्चार्ज देण्यात आलाय.

ठाण्यात काही दिवसांपूर्वी आपल्या रिक्षात एकटी मुलगी प्रवासी पाहून रिक्षा ड्रायव्हरने भलतीकडेच रिक्षा नेत असल्याचं लक्षात येताच एका स्वप्नालीने धावत्या रिक्षातून उडी घेतली होती. या अपघातात ती गंभीर जखमी झाली होती. अपघातानंतर स्वप्नाली कोमात गेली होती. स्वप्नालीच्या मेंदूला मार बसला होता.यासाठी तिच्यावर दोन मोठी ऑपरेशन्सही झाली. मागील महिन्यात 22 ऑगस्ट रोजी स्वप्नाली कोमातून बाहेर आली. आता तीची प्रकृती सुधारली असून हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. मात्र कोमात गेल्यामुळे स्वप्नालीला आधीचं काहीच आठवत नसल्यानं पोलीस तपासातही अडचणी येत आहे. स्वप्नालीला फसवून दुसरीकडे नेऊ इच्छिणारा रिक्षाचालक मात्र अजूनही फरारच आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 3, 2014 05:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading