ट्रॅकला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत

ट्रॅकला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत

  • Share this:

broken-track

03 सप्टेंबर :  दिवा आणि मुंब्रा दरम्यान रेल्वे रूळाला तडे गेल्याने सलग दुसर्‍या दिवशी मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. अप स्लो ट्रॅकवरील वाहतूक फास्ट ट्रॅकवर वळवण्यात आली असून वाहतूक 25 मिनिटं उशिराने चालत आहेत.

दिवा ते मुंब्रा या स्टेशनदरम्यान रूळांना तडे गेल्यामुळे बुधवारी सलग दुसर्‍या दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. तडा गेलेल्या रूळांचे दुरूस्तीचे सुरू असल्यामुळे सध्या मध्य रेल्वेच्या सीएसटीकडे जाणारी सर्व वाहतूक फस्ट ट्रॅकवर वळवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना आजसुद्धा रेल्वे स्टेशनवर ताटकळत उभे रहावे लागणार आहे. कालच मंगळवारी मध्य रेल्वेच्या घाटकोपर-विक्रोळी या स्थानकांदरम्यान सकाळी ओव्हरहेड वायर तुटून छोटा स्फोट झाला होता. त्यामुळे प्रवाशांना आतोनात हाल होत आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 3, 2014 11:28 AM IST

ताज्या बातम्या