'आयएसएयएस'ने केली आणखी एका पत्रकाराची हत्या

 'आयएसएयएस'ने केली आणखी एका पत्रकाराची हत्या

  • Share this:

ISISI

03  सप्टेंबर : जेम्स फॉले पाठोपाठ इस्लामिक अतिरेकी समूह 'आयएसएयएस'ने आणखी एका पत्रकाराची हत्या केली असून त्याचाही व्हिडीओ मंगळवारी प्रसिद्ध केला आहे. अमेरिकन पत्रकार स्टिव्हन सॉटलोफचा शिरच्छेद केल्याचा दावा 'आयएसएयएस'ने केला आहे.

'सेकंड मेसेज टू अमेरिका' या व्हिडीओचं नाव असून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनाही व्हिडीओमधून इशारा देण्यात आला आहे. 'जोपर्यंत अमेरिका इराकवर हवाई हल्ले करत राहिल तोपर्यंत तुमच्या नागरिकांचा अशा पद्धतीने जीव जात राहील', असे यात म्हटलं आहे.

सॉटलॉफच्या कुटुंबियांनी हा व्हिडीओ पाहिला असला तरीही हा व्हिडिओ खरा आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नसून, गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी त्याची सत्यता पडताळून पहात आहेत, असं समजते. 40 वर्षांचा स्टीव्हन, नोव्हेंबर 2013 मध्ये सीरियामधून बेपत्ता झाला होता. जेम्स फॉले याच्या हत्येच्या व्हिडिओमध्येच स्टीव्हनच्या हत्येची धमकी देण्यात आली होती. तर आताच्या व्हिडीओमध्ये ब्रिटनच्या डेव्हिड हेन्सची हत्या करण्याची धमकीही देण्यात आली आहे.

Follow @ibnlokmattv

First published: September 3, 2014, 9:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading