S M L

पराभवाचा वचपा काढत भारताने मालिका जिंकली

Sachin Salve | Updated On: Sep 2, 2014 11:44 PM IST

पराभवाचा वचपा काढत भारताने मालिका जिंकली

india one dau win02 सप्टेंबर : कसोटी सामन्यात लाजीरवाण्या पराभवाचा वचपा काढत भारताने वनडे मालिका खिश्यात घातली आहे. बर्मिंगहॅम चौथ्या वन-डेत भारताने इंग्लंडवर 9 विकेट्स राखून विजय मिळवलाय.

अजिंक्य रहाणेची शानदार सेंच्युरी तर शिखर धवनच्या नॉट आऊट 97 धावांच्या जोरावर भारताने चौथ्या वनडेसह 3-0 अशा फरकाने मालिका जिंकली. भारतीय टीमने तब्बल 24 वर्षांनंतर इंग्लंडमध्ये सीरिज जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे.

बर्मिंगहॅममध्ये रंगलेल्या चौथ्या वनडेमध्ये टॉस जिंकून कॅप्टन धोणीनं पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने बॅटिग करत 206 रन्स पर्यंतच मजल मारता आली. 150 रन्सवर इंग्लंडची निम्मी टीम पॅव्हेलियनमध्ये परतली होती.

इंग्लंडला सुरुवातीलाच भारतीय बॉलर्सनं इंग्लंडच्या बॅट्समनना दणके दिले. कॅप्टन कूक 9, हेल्स 6 तर बॅलेन्स 7 रन्सवर पॅव्हेलियनमध्ये परतले. पण त्यानंतर जो रूट आणि इयॉन मॉर्गननं इंग्लंडची इनिंग सावरली. पण जो रूट 44 तर मॉर्गन 32 रन्सवर पॅव्हेलियनमध्ये परतले. भारतातर्फे भुवनेश्वर कुमारनं 2 तर मोहम्मद शामी, जडेजा आणि रैनानं प्रत्येकी 1 विकेट घेतली. 206 रन्सचं माफक आव्हान भाराताने 9 विकेट्स राखून पूर्ण केलं. मुंबईकर अजिंक्य रहाणेनं 106 रन्स करत शानदार सेंच्युरी ठोकून भारताच्या विजयाची पायाभरणी केली तर शिखर धवनच्या नॉट आऊट 97 रन्स केले. रहाणे आणि धवन या जोडींने भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा करून दिला. भारताने 3-0 ने मालिका जिंकत शेवट गोड केला.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 2, 2014 11:44 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close