श्रीनिवासन अध्यक्षपदी नको, कोर्टाने याचिका फेटाळली

श्रीनिवासन अध्यक्षपदी नको, कोर्टाने याचिका फेटाळली

  • Share this:

sc on shrinivasan01 सप्टेंबर : बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन यांना पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे. एन श्रीनिवास यांची पुन्हा बीसीसीआय अध्यक्ष म्हणून नियुक्ती व्हावी यासंदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे.

तसंच आयपीएल भ्रष्टाचार प्रकरणी सुप्रीम कोर्टाने मुदगल समितीला 2 महिन्यांचा वाढीव कालावधी दिला आहे.

इतकच नाही तर मुदगल समितीला इतरही अंतरीम अहवाल सादर करण्यास सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे. यानुसार आता मुदगल समिती आपल्या अहवालात एन श्रीनिवासन किंवा बोर्डाच्या इतरही अधिकार्‍यांसंदर्भातील अहवाल सादर करू शकणार आहे.

Follow @ibnlokmattv

First published: September 1, 2014, 11:28 PM IST

ताज्या बातम्या