पाकिस्तानात आंदोलक आणखी आक्रमक

पाकिस्तानात आंदोलक आणखी आक्रमक

  • Share this:

pak Controsss

01 स्पटेंबर : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ हे सध्या लष्करप्रमुख जनरल राहील शरीफ यांच्याशी चर्चा करत आहेत. पाकिस्तानमध्ये पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या राजीनाम्यासाठी पाकिस्तान तेहरीक ए इन्साफचे नेते इम्रान खान यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला शनिवारपासून हिंसक वळण लागलं आहे.

आंदोलकांनी पाकिस्तानमधील पीटीव्ही या सरकारी चॅनलचा ताबा घेऊन चॅनलचे प्रसारण बंद पाडले. अखेर सैन्य आणि निमलष्करींनी आंदोलकांना इमारतीबाहेर काढलं आणि चॅनलचं प्रसारण पुन्हा सुरू केलं. पाकिस्तानमध्ये 15 ऑगस्टपासून पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याविरोधात पाकिस्तान तेहरीक ए इन्साफचे इम्रान खान आणि पाकिस्तान अवामी तहरीकचे मौलवी ताहिर उल कादरी यांनी आंदोलन पुकारले आहे. सोमवारी आंदोलकांनी पोलिसांचा विरोध झुगारुन इस्लामाबादमधल्या पाकिस्तानी सचिवालयाचा गेट तोडून, आत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांना रोखळण्यासाठी पोलिसांनी अश्रूधूर आणि रबरी गोळ्यांचा मारा केला तर आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. शनिवारी रात्री त्यांनी नवाज शरीफ यांच्या निवासस्थानावर धडक मारली होती. यावेळी हजारो कार्यकर्ते पंतप्रधानांच्या घराचं कुंपण तोडण्यासाठी वायर कटर घेऊन आले होते. अखेर त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला होता, त्यामध्ये शेकडो निदर्शक जखमी झाले होते, तसंच किमान दोघांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, सरकारी चॅनलच ताब्यात घेण्याच्या विरोधकांच्या या कृतीचा पाकिस्तानात निषेध केला जातं आहे. इम्रान खान या आंदोलनाच्या माध्यमातून लष्कराला पुन्हा सत्ता हाती घेण्यासाठी उद्युक्त करत आहेत. मात्र, लष्कराला विरोध करणारे राजकीय विश्लेषक नवाज शरीफ यांच्या बाजूने आहेत असं सांगण्यात येतं आहे.

Follow @ibnlokmattv

First published: September 1, 2014, 2:46 PM IST

ताज्या बातम्या