News18 Lokmat

जयपूर पिंक पँथर्स प्रो कबड्डी लीग चॅम्पियन

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Sep 1, 2014 02:49 PM IST

जयपूर पिंक पँथर्स प्रो कबड्डी लीग चॅम्पियन

01 सप्टेंबर :  मुंबईत झालेल्या पहिल्या प्रो कबड्डी लीगमध्ये अभिषेक बच्चनच्या पिंक पँथर्स टीमचा विजय झाला आहे. मुंबई वरळीतल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडीयमवर काल रात्री ही मॅच पार पडली. फायनलमध्ये पिंक पँथर्सने 35-24ने यू मुम्बाचा पराभव केला आहे. महिनाभरापूर्वी सुरू झालेल्या या स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात मुंबई संघाकडून पराभूत झालेल्या अभिषेक बच्चन यांच्या जयपूर संघानं थाटात पराभवाची परतफेड केली आहे. अतिशय नियोजनबद्ध खेळ करणार्‍या जयपूर पिंक पैंथरने पिछाडीमुळे अस्थिर झालेल्या यू मुम्बाचा पराभव करून पहिल्यावहिल्या प्रो-कबड्डीचे विजेतेपद पटकावलं आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 1, 2014 09:39 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...