मुंबईत पावसाची जोरदार हजेरी

मुंबईत पावसाची जोरदार हजेरी

  • Share this:

mumbai_rain31 ऑगस्ट :  मुंबईत आज काही ठिकाणी पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून जोरदार पाऊस पडतं आहे. वसई-विरारमध्ये कालपासूनच जोरदार पाऊस पडतं आहे. पण आता पावसानं थोडी विश्रांती घेतली आहे.

दापोली तालुक्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊसामुळे कोटजाई नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे 14 गावांना धोका असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेकांच्या घरात पाणी घुसलं असून 35 घरांवना स्थलांतराचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. वांद्रा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे फक्राबाद - वाशी पारा या गावचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातल्या इतर तलावांच्या आणि धरणांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे.

Follow @ibnlokmattv

First published: August 31, 2014, 1:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading