S M L

अखेर 'त्या' बिबट्याची सुखरूप सुटका

Sachin Salve | Updated On: Aug 30, 2014 04:41 PM IST

अखेर 'त्या' बिबट्याची सुखरूप सुटका

nappur bibtya30 ऑगस्ट : नागपूर जिल्ह्यातील खापा येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात वन विभागाच्या कर्मचार्‍यांना यश अखेर आलंय.

एकीकडे वन कर्मचार्‍यांचा संप असल्यामुळे वन्यजीवांची रक्षणाची जबाबदारी असलेले कर्मचारी या खाप्यात पोहचले आणि त्यांनी या बिबट्याला खाटीच्या माध्यमातून सुखरूप बाहेर काढले.

वन विभागातील सर्व वनमजूर, वनरक्षख आणि वनपाल कर्मचार्‍यांनी गेल्या 25 ऑगस्टापासून संप पुकारला आहे. त्यामुळे या मदतकार्यात कुणाची मदत घ्यावी असा प्रश्न वनकर्मचार्‍यांपुढे पडला होता.

या विहिरीत पाणी असल्यामुळे वनाधिकार्‍यांनी बिबट्याला बेशुद्ध न करताच तसेच बाहेर काढण्याचे धाडस दाखवले. विहिरीतून बाहेर काढल्यानंतर बिबट्याला पिंजर्‍यात कैद न करता त्याला जंगलात सोडून देण्यात आले. वन्य रक्षकांच्या या कामगिरीमुळे वन्यप्रेमींनी समाधान व्यक्त केलंय पण गावकर्‍यांनी मात्र नाराजी व्यक्त केलीये.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 30, 2014 03:32 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close