प्रामाणिक प्रयत्न केले तर आघाडी होईल -मुख्यमंत्री

प्रामाणिक प्रयत्न केले तर आघाडी होईल -मुख्यमंत्री

  • Share this:

cm on pawar28 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीवरून वारंवार प्रश्नचिन्हं उपस्थित केली जात आहे. आघाडीची चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षांनी प्रामाणिक प्रयत्न केले तर आघाडी नक्की होईल आणि यात मला कोणतीही अडचण वाटत नाही असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.

जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. त्यातून योग्य तो मार्ग काढला जाईल. काही जागा कमी होतील तर काही जागांची अदलाबदल होईल पण अजून याबाबत चर्चा सुरू आहे.

संपूर्ण राज्याचा आढावा घेऊनच योग्य तो निर्णय घेतला जाईल. आघाडी होईल आणि जनता आम्हाला पुन्हा आशीर्वाद देतील असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

विशेष म्हणजे दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी अलीकडेच राष्ट्रवादीला जागावाटपावरुन खडेबोल सुनावले होते. राष्ट्रवादीची 144 जागांची मागणी अमान्य आहे जर त्यांना आघाडी करायची असेल तरच पुढीची बोलणी होईल असं माणिकराव ठाकरे यांनी सुनावलं होतं.

Follow @ibnlokmattv

First published: August 28, 2014, 10:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading