28 ऑगस्ट : अवघ्या जगाने अलीकडेच ब्राझीलमध्ये फुटबॉल वर्ल्डकपचा थरार 'याची देही याची डोळा' अनुभवाला पण जगाच्या पाठीवर फुलबॉल सारखाच्या थरारक खेळात मात्र भारताचे स्थान अजूनही धूसरच आहे. हीच कमी लक्षात घेऊन आयएमजी रिलायन्स आणि स्टार इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने इंडियन सुपर लीगचा 'श्रीगणेशा' करण्यात आलाय. भारतात पहिल्यांदाच फुटबॉलचा थरार आता फुटबॉलप्रेमींना अनुभवता येणार आहे.
आज (गुरुवारी) मुंबईत एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये इंडियन सुपर लीगचा मोठ्या दिमाखात शुभारंभ करण्यात आला. इंडियन सुपर लीगमधून आपल्याला भारताचे उद्याचे फुटबॉल स्टार्स मिळणार आहेत पण या नवा 'मोहिमे'ची सुरुवात केली ती रिलायन्स फायउंडेशनच्या चेअरमन नीता अंबानी यांनी. देशात फुटबॉल सारख्या खेळाला एक वेगळा दर्जा मिळेल याचा येणार्या पिढीला मोठा फायदा होईल असा विश्वास नीता अंबानी यांनी व्यक्त केला.
या लीगच्या निमित्ताने क्रिकेटपटू आणि अभिनेते एकाच व्यासपीठावर एकत्र आले आहेत. आजच्या या सोहळ्याला मास्टर ब्लास्टर आणि विक्रामादित्य सचिन तेंडुलकर, अभिनेता रणबीर कपूर, जॉन अब्राहम,अभिषेक बच्चन हजर होते. यावेळी देशात फुटबॉलला अधिक उंची लाभेल अशा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.
येत्या 12 ऑक्टोबर ते 20 डिसेंबरपर्यंत इंडियन सुपर लीगचं पहिलं सिझन पार पडणार आहे. या लीगमध्ये एकूण आठ टीम असणार आहे. दिल्ली, गोवा, गुवाहटी, कोची, कोलकाता, मुंबई पुणे आणि चेन्नई या टीममध्ये हा मुकाबला रंगणार आहे. आयसीएलमध्ये बक्षिसांचंही खास आकर्षण आहे. बक्षिसाची एकूण रक्कम ही 15 कोटी इतकी आहे. प्रत्येक फ्रँचाईझीची किंमत ही 120-180 कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे प्रत्येक टीममध्ये 14 भारतीय प्लेअर्स असणार आहे त्याच्याबरोबर 7 परदेशी प्लेअर्सही असणार आहे.
अशा आहेत इंडियन सुपर लीगच्या टीम्स
आयसीएलचे टीम मालक
बक्षिसांची लयलूट
असं आहे आयसीएलचे स्वरुप
आयसीएलमधील परदेशी क्लब
Follow @ibnlokmattv |