IPLच्या धर्तीवर लवकरच सुरू होतेय इंडियन सुपर लीग

IPLच्या धर्तीवर लवकरच सुरू होतेय इंडियन सुपर लीग

  • Share this:

indian super leage

ब्युरो रिपोर्ट, आयबीएन लोकमत

28 ऑगस्ट :  भारतीय क्रीडा क्षेत्रातील एका एक्साईटिंग लीगला लवकरच सुरुवात होणार आहे. इंडियन प्रिमियर लीग (IPL) च्या धर्तीवर IMG रिलायन्स आणि स्टार इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानं लवकरच इंडियन सुपर लीग (ISL)या फुटबॉल स्पर्धेला सुरुवात होत आहे.

भारतीय क्रिकेट स्टार्स सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली, बॉलीवूड स्टार्स सलमान खान, रणबीर कपूर आणि जॉन अब्राहम, आपल्या सगळ्यांसाठी ही नावं काही नवीन नाहीत. प्रत्येकानं आपापल्या क्षेत्रात एक उंची गाठली आहे आणि आता ते एकत्र आलेत ते एका एक्सायटिंग फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय फुटबॉलला आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण करण्यासाठी इंडियन सुपर लीगचा जन्म झाला आहे

IMG रिलायन्स आणि स्टार इंडियाच्या संयुक्त विद्यमानं ISLनं भारतीय फुटबॉलला नवी ओळख दिली आहे. जागतिक फुटबॉलमधील काही बड्या खेळाडूंना या स्पर्धेसाठी साईन केलं गेलं आहे. वर्ल्ड कप विजेता डेव्हिड ट्रेझिग्वे पुणे FC चा, 2010चा वर्ल्ड कप विजेता जोन केपडिव्हिआ हा नॉर्थ ईस्ट युनायटेडचा तर इटालियन लेजंड अलेक्झांड्रो डेल पिएरो हा दिल्ली डायनामोजचा मार्की प्लेअर असेल तर 8 शहरांच्या टीम्समध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि भारतीय खेळाडूंचा मिलाफ असणार आहे.

ISLच्या लाँचअगोदरच या बड्या सेलिब्रिटीजच्या येण्याने एक उत्सुकता निर्माण झाली आहे. EPL आणि क्लब फुटबॉलमधील फिओरेंटिना, ऍटलेटिको मादि्रद आणि फायेनूर्डसारख्या अनेक नामवंत टीम्सनं ISLच्या टीम्सबरोबर भागीदारी केली आहे. त्यामुळे या स्पर्धेनं उत्तम फुटबॉल तर आपल्याला बघायला मिळेलच पण त्याचबरोबर भारतीय फुटबॉलला एक उभारीही नक्कीच मिळणार आहे.

Follow @ibnlokmattv

First published: August 28, 2014, 10:25 AM IST

ताज्या बातम्या