गणेशोत्सवादरम्यान बेस्ट प्रशासन आणि पोलिस ठेवणार वीजचोरांवर नजर

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Aug 28, 2014 03:09 PM IST

गणेशोत्सवादरम्यान बेस्ट प्रशासन आणि पोलिस ठेवणार वीजचोरांवर नजर

rakesh maria on Electricity robbery

28 ऑगस्ट : आपल्या गल्लीचा, विभागाचा किंवा मंडळाचा गणपती इतर मंडळांच्या गणपतींपेक्षा जास्त उठून दिसावा, आपला उत्सव इतरांपेक्षा जास्त झगमगीत असावा, या प्रयत्नात असलेल्या मुंबई शहर विभागातील सर्वच गणेशोत्सव मंडळांना वाटत असतं. पण गणेशोत्सव काळात होणारी वीजचोरी रोखण्यासाठी बेस्ट आणि मुंबई पोलिस यांनी संयुक्त मोहीम हाती घेतली आहे.

दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान बेस्टच्या विद्युत विभागाची भरारी पथके मुंबई शहर विभागात बेस्टच्या हद्दीत मोहिमा हाती घेत असतात. गेल्या वर्षी 400 हून अधिक मंडळांवर अनधिकृत वीज वापरल्याबद्दल कारवाई करण्यात आली होती. या मंडळांविरोधात तक्रारही करण्यात आली होती. मात्र अद्याप या प्रकरणी आरोपपत्र दाखल झालेले नाही.

यंदा बेस्टने ही वीजचोरी रोखण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी एका पथकाची स्थापना केली आहे. त्यात बेस्टचे मुख्य दक्षता अधिकारी, बेस्टचे मुख्य सुरक्षा अधिकारी आणि पोलिस उपायुक्त (अंमलबजावणी) हे या पथकाचे प्रमुख असणार आहेत. हायकोर्टाच्या आदेशानंतर या पथकाची स्थापना करण्यात आलीय. मुंबईत दीड कोटींची तर राज्यभरात 250 कोटींची वीजचोरी होते. याबाबत सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी जनहित याचिका दाखल केली होती. या उपायांमुळे यंदा गणेशोत्सवादरम्यान वीजचोरी कमी होण्याची शक्यता आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2014 09:10 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...