News18 Lokmat

'जिहाद'साठी इराकमध्ये गेलेल्या 'त्या' चौघांपैकी एकाचा मृत्यू

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 27, 2014 10:33 PM IST

'जिहाद'साठी इराकमध्ये गेलेल्या 'त्या' चौघांपैकी एकाचा मृत्यू

27 ऑगस्ट : 'हम लोग जिहाद के लिये निकल चुके है, अब हमारी मुलाकत जन्नत में होगी' असं सांगून कल्याणमधून तीन महिन्यांपूर्वी 'जिहाद'साठी इराकमध्ये गेलेल्या चार तरुणांपैकी एकाचा अतिरेकी हल्ल्यात मृत्यू झाला आहे. बगदादमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात आरिफ एजाज माजिदचा मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या पालकांना मिळाली आहे. त्याच्यासोबतच इराकला गेलेल्या शाहीद टंकीनं आरिफच्या आई-वडिलांना फोन करून आरिफचा मृत्यू झाल्याची माहिती दिलीये. मात्र पोलिसांकडे अशी कोणतीही अधिकृत माहिती अजून मिळालेली नाही.

मे महिन्यात कल्याणमध्ये चार तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार समोर आली पण त्याहुन धक्कादायक म्हणजे हे उच्चशिक्षित तरुण जिहादसाठी इराकमध्ये गेले असल्याचं समोर आलं. कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात मे महिन्याच्या 25, 26, आणि 27 तारखेला या चौघांची बेपत्ता असल्याची तक्रार पालकांनी नोंदवली होती.

आरिफ एजाज माजिद, सईद फारुक तानकी, फहद, तन्वीर मकबूल आणि अमन नईम तांडेल अशी या चौघांची नाव आहे. हे चौघे इराकमध्ये सुरू असलेल्या साम्प्रदाईक युद्धात सहभागी होण्यासाठी गेले. या चार तरुणातील तिघे जण हे इंजियनियरिंगचे विद्यार्थी असून एक बारावीचा विद्यार्थी आहे. आज ज्याचा मृत्यू झाला त्या आरिफ एजाज मजीद याने आपल्या कुटुंबाला जाण्यापूर्वी पत्र लिहिलं होतं. या पत्रात तहम लोग जिहाद के लिये निकल चुके है, आप हमे खोजने की कोशिश मत करना, अब अपनी मुलाखत जन्नत मे होगी अशा आशयाचा मजकूर पत्रात लिहलेला होता.

अगोदर ही घटना तरुणांच्या पालकांनी फेटाळून लावली. आता मात्र त्यातील एका तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा दुजोरा मिळाला आहे. या चार तरुणांपैकी शाहिदने आरिफच्या पालकांना फोन करुन आरिफच्या मृत्यूची माहिती दिली. त्यांच्यासोबत गायब झालेले इतर दोघे कुठे आहेत हे मात्र शाहिदलाही माहिती नसल्याचं कळतंय.दुदैर्वाची गोष्ट म्हणजे आज ज्याच्या मृत्यू झाला त्याच आरिफने आम्ही जिहादसाठी जातोय आणि आपली भेट आता स्वर्गात होईल असं पत्र पालकांना लिहिलं होतं.

'आयसीस'मध्ये 100 हून अधिक भारतीय तरुण भरती

Loading...

दरम्यान, इराकमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडवणारअया आयसीस या दहशतवादी संघटनेचा भारतातही लक्षणीय शिरकाव झाल्याचं उघड झालंय. केंद्रीय सुरक्षा एजन्सीजच्या मते आयसीसमध्ये 100हून अधिक भारतीय तरुण भरती झाले असावेत. महाराष्ट्रासह तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि काश्मीरमधून आयसीस तरुणांची भरती करण्याचा प्रयत्न करत असल्याचं या एजन्सींनी सांगितलंय.

गरीब मुस्लिम तरुणांना आकर्षित करण्यासाठी ऑनलाईन व्हिडिओचा वापर केला जातोय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयसीसच्या भारतातल्या कारवायांसंबधी एनआयए डॉसियर तयार करत आहे. एनआयएला वाँटेड असलेला इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी आयसीससाठी भरती करत असल्याचा संशय आहे. इराक आणि सिरीयातली परिस्थिती सुधारल्यानंतर या तरुणांचा भारतात दहशतवादी कारवायांसाठी वापर केला जाऊ शकतो, अशी भीती एजन्सीजना वाटतेय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 27, 2014 06:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...