अमित देशमुखांपुढे 'गड' राखण्याचं आव्हान

अमित देशमुखांपुढे 'गड' राखण्याचं आव्हान

  • Share this:

 amit deshmukh27 ऑगस्ट : आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेत लातूर काँग्रेस कामाला लागली आहे. विशेषत: काँग्रेसचे राज्यमंत्री अमित देशमुख यांनी विकासकामांच्या शुभारंभाचा धडाका लावला आहे.

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं निधन, लोकसभा निवडणुकीतला पराभव आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी इतर पक्षांची धरलेली वाट यामुळे देशमुखांसमोर मोठं आव्हान आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात भाजप, शिवसेनेनंही कंबर कसलीय. त्यामुळे काँग्रेसला आपला गड राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

आगामी विधानसभा निवडणूक लक्ष्यात घेत लातूर जिल्ह्यातील सगळेच पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते जोमानं कामाला लागले आहेत. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर लातुरातल्या काँग्रेसची धुरा सांभाळणारे राज्यमंत्री अमित देशमुख यांनी तर आपल्या मतदार संघात विकासकामांच्या शुभारंभाचा धडाकाच सुरू केलाय. महामानावांच्या पुतळ्यांचं अनावरण असो अथवा बांधकाम विभागाच्या कामांचे अनावरण असो अमित देशमुख पुढाकार घेत आगामी निवडणुकीची गणितं मांडत आहेत.

लवकरच येऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक अजून जाहीर झालं नसलं तरी विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता डोळ्यासमोर ठेवत लातूर काँग्रेस आता दंड थोपटले आहेत. लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवामुळे येत्या विधानसभा निवडणुकीचा चांगलाच धसका लातूरच्या काँग्रेसने घेतलाय. त्यामुळेच अगदी लहानमोठ्या समारंभाला अमित देशमुख आवर्जून उपस्थित राहत आहेत. शहरातल्या अहिल्यादेवी पुतळयाचं अनावरण करून धनगर समाजाचा वाढता रोष देखील कमी करण्याचा प्रयत्न अमित देशमुख यांनी केलाय. त्याबरोबरच धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असून योग्य न्याय मिळेल असं देशमुख यांनी सांगितलंय.

विलासराव देशमुख यांच्या अकाली निधनानंतर लातूरच्या काँग्रेसची सूत्रं आता अमित देशमुख यांच्याकडे आहेत. त्यांच्या नेतृत्वात झालेल्या लोकसभा निवडणुकीतला पराभव आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी अचानकपणे दुसर्‍या पक्षात केलेला घरोबा यामुळे येत्या निवडणुकीत देशमुखांसमोर मोठं आव्हान उभं टाकलंय.

या आव्हानांना देखील समर्थपणे तोंड देण्याची तयारी केली असल्याचे अमित देशमुख यांनी सांगितलंय. काँग्रेसचा गड समाजला जाणार्‍या लातुरात आता भाजप आणि शिवसेनेनं देखील विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसलीय. त्यातच भाजपा आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचे लातूर दौरे देखील वाढल्याने काँग्रेसला यावेळी विजयासाठी चांगलीच कसरत करावी लागणार हे मात्र नक्की.

Follow @ibnlokmattv

First published: August 27, 2014, 4:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading