आघाडीत गळती सुरूच, कोकणात राणेंही पडले एकटे !

आघाडीत गळती सुरूच, कोकणात राणेंही पडले एकटे !

  • Share this:

narayan Rane26 ऑगस्ट : नारायण राणे काँग्रेसच्या निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख झाले खरे पण राणेंचे एकेक साथीदार त्यांना सोडून परत शिवसेनेत दाखल होत आहे. आज आणखीही काही राणेंचे प्रमुख समर्थक त्यांची साथ सोडण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे सध्या राणेंना कोकणात समर्थक आमदारच उरलेला नाही अशीच स्थिती आहे. राणेंचे सिंधुदुर्गातले कट्टर विरोधक दीपक केसरकर राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत दाखल झाले आहेत तर सुभाष बने आणि गणपत कदम या रत्नागिरी मधल्या राणे समर्थक नेत्यांनीही पुन्हा शिवबंधन बांधून घेतलंय. त्यामुळे राणेंच्या विरोधात शिवसेनेची संघटनात्मक ताकद कोकणात वाढू लागलीय. तर दुसरीकडे आघाडीलाही गळती लागली आहे.  काँग्रेसचे माजी नेते आणि खासदार अशोक चव्हाण यांचे मेव्हणे भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमधून बाहेर पडले आहे. तर राष्ट्रवादीत माजी वैद्यकीय मंत्री विजयकुमार गावित, बबन पाचपुते, माजी मंत्री सूर्यकांता पाटील, किसन कथोरे, किशोर कन्हेरे आणि प्रकाश सुर्वे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे.

नाराज राणे समर्थक सेनेत

- रवींद्र फाटक : 2009 चे कणकवली विधानसभा पराभूत समर्थक आपल्या उमेदवार नगरसेवकांसह शिवसेनेत दाखल

- सुभाष बने : संगमेशवर देवरुख भागातले समर्थक माजी आमदार : शिवसेनेत दाखल

- गणपत कदम : राजापूर मतदार संघातले समर्थक माजी आमदार : शिवसेनेत दाखल

- राजन तेली : राणेंचे कट्टर समर्थक मानले जाणारे विधान परिषद आमदार : राष्ट्रवादीच्या वाटेवर : सावंतवाडीतून निवडणूक लढवणार

- शाम सावंत : रायगड जिल्ह्यातले पराभूत समर्थक आमदार : सध्या काँग्रेसमध्ये नाराज .

आघाडीला गळती काँग्रेसमध्ये

- भास्करराव पाटील खतगावकर

- विनायक निम्हण

राष्ट्रवादीत

- विजयकुमार गावित

- बबन पाचपुते

- सूर्यकांता पाटील

- किसन कथोरे

- किशोर कन्हेरे

- प्रकाश सुर्वे

Follow @ibnlokmattv

First published: August 26, 2014, 8:04 PM IST

ताज्या बातम्या