किसन कथोरे यांनी दिला राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा

किसन कथोरे यांनी दिला राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा

  • Share this:

kathore resign

25 ऑगस्ट :   मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार, कोकण पाटबंधारे विभागाचे उपाध्यक्ष किसन कथोरे यांनी रविवारी राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिला. तसेच आज ते विधानसभा सदस्यत्वाचाही राजीनामा देणार आहेत. राजीनामा दिल्यावर पुढचा निर्णय काय घेणार, यावर मात्र ते काहीही बोलले नाहीत. पण कथोरे आता भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज त्यांनी भाजपनेते नितीन गडकरींची भेट घेतली. 2004 साली अंबरनाथ मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढवीत असताना खोटे प्रतिज्ञा पत्र सादर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

कथोरेंच्या राजीनाम्यामुळे ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीला मोठा हादरा मानला जात आहे. कथोरे यांच्या राष्ट्रवादीतील राजीनाम्यानंतर अंबरनाथ, मुरबाड आणि कल्याण या तीन तालुक्यांतील नगरसेवक आणि ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचानी पक्षाचे राजीनामे द्यायला सुरवात केली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 25, 2014 03:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading