पाकिस्तानकडून भारताच्या 35 बीएसएफच्या चौक्यांवर गोळीबार

पाकिस्तानकडून भारताच्या 35 बीएसएफच्या चौक्यांवर गोळीबार

  • Share this:

ceasefire

25 ऑगस्ट :  पाकिस्तानी लष्करानं पुन्हा एकदा सीमेवर जोरदार गोळीबार सुरू केला. रविवारी रात्रीपासून आज (सोमवारी) पहाटेपर्यंत 35 बीएसएफच्या चौक्यांवर गोळीबार करण्यात आला आहे.

जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेवरच्या बीएसएफच्या चौक्यांना पाक सैन्याने लक्ष्य करत गोळीबार केला. अखनूर, आर एस पुरा, अर्निया आणि रामगड सेक्टरमध्ये बीएसएफच्या चौक्यांवर मशिनगनच्या माध्यमातून जोरदार गोळीबार करण्यात आला. रविवारी रात्री दहा वाजल्यापासून सुरू झालेला गोळीबार आज पहाटेपर्यंत सुरूच होता. यात 2 जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानकडून होत असलेल्या या शस्त्रसंधी उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर भाजप अध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आज आर एस पुरा सेक्टरचा दौरा करणार आहेत.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 25, 2014 11:45 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...