मालगाडीचे डबे हटवले, कोकण रेल्वे सुरळीत

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Aug 25, 2014 01:03 PM IST

मालगाडीचे डबे हटवले, कोकण रेल्वे सुरळीत

derailed5

25 ऑगस्ट : कोकण रेल्वे मार्गावर मालगाडीचे घसरलेले 7 डबे रुळावरून हटवण्यात 26 तासांनंतर अखेर यश आलं आहे. करंजाडी रेल्वे स्टेशनजवळ काल (रविवारी) सकाळी मालगाडीचे 7 डबे घसरल्याने कोकण रेल्वे ठप्प झाली होती. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांचे मात्र चांगलेच हाल झाले.

जवळपास 26 तासाच्या प्रयत्नांनंतर मालगाडीचे घसरलेले डबे हटवून मार्ग मोकळा करण्याचे काम पूर्ण झालं असून कोकण रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा हळूहळू सुरळीत होतं असल्याची माहिती रेल्वे अधिकार्‍यांनी दिली आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 25, 2014 10:50 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...