News18 Lokmat

पाकिस्तानकडून पुन्हा बीएसएफच्या 20 पोस्टवर गोळीबार

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Aug 24, 2014 06:11 PM IST

पाकिस्तानकडून पुन्हा बीएसएफच्या 20 पोस्टवर गोळीबार

24 ऑगस्ट :  पाकिस्तानी सैन्याने काल (शनिवारी) रात्री पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. जम्मूतल्या आर.एस.पुरा सेक्टरमध्ये 20 बीएसएफ पोस्टवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरू होता. जम्मू-काश्मीरमधल्या विविध पोस्टवर पाक सैन्याकडून शनिवार रात्री 10 वाजल्यापासून आज (रविवार) पहाटेपर्यंत गोळीबार सुरू होता. भारताच्या जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. अर्निया, आर.एस.पुरा आणि अखनूर सेक्टरमधील चौक्यांवर गोळीबार करण्यात आला.

पूँछ आणि मेंढर सेक्टरमध्येही गोळीबार झालाय. बीएसएफच्या 20 चौक्यांवर पाकिस्ताननं गोळीबार केला. आता सध्या गोळीबार थांबला आहे. पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन होतंय. त्यामुळे परिसरातल्या नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे.

शुक्रवारी रात्री पाक सैन्याने केलेल्या गोळीबारात सीमेवरच्या गावातल्या दोन नागरिकांचा मृत्यू झाला होता तर पाच जण जखमी झाले होते. त्यानंतर पुन्हा सलग दुसर्‍या दिवशी पाक सैन्याकडून गोळीबार करण्यात आला आहे. पाककडून सतत होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाबाबत केंद्रीय संरक्षणमंत्री अरुण जेटली म्हणाले होते, की गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यास आपले जवान सक्षम आहेत. लष्करी जवानांवर संपूर्ण देशाचा विश्वास आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यापासून पाक सैन्याकडून सुमारे 70 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 24, 2014 02:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...