कोल्हापूरच्या शाहू टोलनाक्याजवळ गावठी बॉम्बस्फोट

कोल्हापूरच्या शाहू टोलनाक्याजवळ गावठी बॉम्बस्फोट

  • Share this:

kolhapur blast

24 ऑगस्ट :  कोल्हापूर जवळच्या शाहू टोलनाक्याजवळ काल गावठी बॉम्बचा स्फोट झाला आहे. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास एका चायनीजच्या गाडीवर हा स्फोट झाला असून या स्फोटामध्ये 2 तरुण किरकोळ जखमी झालेत. घटनास्थळावरून मिळालेले काही साहित्य एटीएसच्या पथकाने ताब्यात घेतलं आहे. स्फोटाचं कारण अजूनही स्पष्ट झालेल नसून स्फोटानंतर घटनास्थळावरून एक इलेक्ट्रिक सर्किट आणि छर्रेसुद्धा आढळून आले आहेत. या स्फोटाच्या संपूर्ण तपासासाठी पुण्यातलं एटीएसचं एक पथक कोल्हापुरात दाखल झाले आहे.

विशेष म्हणजे कोल्हापूरच्या वादग्रस्त टोलमुळे सगळ्याच टोलनाक्यांवर पोलीस बंदोबस्त तैनात आहे. स्फोटाची तीव्रता जरी कमी असली तरी कोल्हापुरात बॉम्बस्फोटाची ही पहिलीच घटना असल्याने आजूबाजूच्या परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे. सहा महिन्यांपूर्वी कागलमध्ये बॉम्ब तयार करून विकणार्‍या एका टोळीला पोलिसांनी पकडलं होतं, त्यामुळे या घटनेशी त्या टोळीचा काय संबंध आहे का याचाही तपास पोलीस करत आहेत.

Follow @ibnlokmattv

First published: August 24, 2014, 2:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading