मालगाडीचे 7 डबे घसरले; कोकण रेल्वे विस्कळीत

मालगाडीचे 7 डबे घसरले; कोकण रेल्वे विस्कळीत

 • Share this:

derailed train

23 ऑगस्ट : कोकण रेल्वे मार्गावर करंजाडी रेल्वे स्टेशनजवळ मालगाडीचे 7 डबे रुळावरून घसरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. कोकणात जाणार्‍या अनेक गाड्या विविध स्टेशन्सवर अडकल्याने गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांचे मात्र चांगलेच हाल झाले आहेत.

मालगाडीचे घसरलेले डबे हटवून मार्ग मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहेत. पण वाहतूक पूर्ववत होण्यासाठी आणखी काही तास लागणार असल्याचं कोकण रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. रेल्वे प्रवाशांनी पेण स्टेशनवर गोंधळ घालून आपला संताप व्यक्त केला, त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

दरम्यान, प्रवाश्यांसाठी कोकण रेल्वेकडून पर्यायी व्यवस्था देण्यात आली आहे. वीर आणि खेडदरम्यान 40 बसेस आणि पेण स्टेशनवरून 4 एसटी बसेस सोडण्यात आल्या आहेत. रखडलेल्या कोकण रेल्वे प्रवाशांना एसटीचा मदतीसाठी हात दिला आहे. महाड ते खेडदरम्यान सोडल्या 75 एसटी बसेस सडल्याची माहिती, एसटीच्या जनसंपर्काधिकार्‍यांनी दिली आहे.

कोकण रेल्वेच्या डाऊन मार्गावरील आजच्या पुढील गाड्या रद्द

 • 01003 दादर-सावंतवाडी विशेष रद्द
 • 10103 सीएसटी-मडगाव मांडवी एक्स्प्रेस रद्द
 • 12051 दादर-मडगाव जन्मशताब्दी एक्स्प्रेस रद्द
 • 02005 एलटीटी-करमाळी विशेष डबलडेकर रद्द
 • 50105 दिवा-सावंतवाडी पॅसेंजर रद्द
 • 50107 सावंतवाडी-मडगाव पॅसेंजर रद्द
 • 50103 दादर-रत्नागिरी पॅसेंजर रद्द

कोकण रेल्वेच्या अप मार्गावरील आजच्या पुढील गाड्या रद्द

 • 10104 मडगाव-सीएसटी मांडवी एक्स्प्रेस रद्द
 • 12052 मडगाव-दादर जन्मशताब्दी एक्स्प्रेस रद्द
 • 01042 करमाळी-सीएसटी विशेष रद्द
 • 50106 सावंतवाडी-दिवा पॅसेंजर रद्द
 • 50108 मडगाव-सावंतवाडी पॅसेंजर रद्द
 • 50104 रत्नागिरी-दादर पॅसेंजर रद्द
 • 02004 करमाळी-सीएसटी शताब्दी रद्द

Follow @ibnlokmattv

First published: August 24, 2014, 11:31 AM IST

ताज्या बातम्या