बंगलोरचा चेन्नईवर दोन विकेट्स राखून विजय

14 मे,बंगलोर आणि चेन्नई दरम्यानची आजची मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगली. अखेर बंगलोरने ही मॅच फक्त दोन विकेट्स राखून जिंकली. चेन्नई टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणीने टॉस जिंकून आज पहिली बॅटिंग घेतली. पण मॅथ्यू हेडन वगळता त्यांचा एकही बॅट्समन रन्स करु शकला नाही. 20 ओव्हर्समध्ये चेन्नईची टीम 129 रन्स करुन आऊट झाली. हेडनने 38 बॉल्समध्ये 60 रन्स केले. बंगलोर टीममध्ये कुंबळे, विनय कुमार आणि कॅलीस यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. जिंकण्यासाठी 130 रन्सचं आव्हान घेऊन मैदानावर उतरलेल्या बंगलोर टीमची सुरुवातही चांगली झाली नाही. उथप्पा, कॅलीस आणि द्रविड झटपट आऊट झाले. पण रास टेलर 46 आणि विराट कोहलीने 38 रन्स करत बंगलोरला विजय मिळवून दिला. आजच्या विजयामुळे बंगलोर टीमचे 12 पॉइंट्स झाले असूल पॉइंट टेबलमध्ये त्यांनी चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 14, 2009 04:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading