23 ऑगस्ट : संगमनेरमध्ये राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर शाईफेक करण्याची घटना घडलीये. शिवसेनेचा कार्यकर्ता भाऊसाहेब हसे यानेही शाईफेक केलीय. हा व्यक्ती धनगर समितीचा कार्यकर्ता असल्याचंही कळतंय. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.
संगमनेरमधील राजापूर इथं बाळासाहेब थोरात विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आले होते त्यावेळी ही घटना घडली. बाळासाहेब थोरात यांच्यावर शाईफेक केल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी संताप व्यक्त करत राजापूर येथील शिवसेना कार्यालयाची तोडफोड केली आहे.
तसंच शाईफेकीच्या निषेधार्थ रास्तारोकोही केला आहे. मात्रही घटना राजकीय वैमनस्यातून घडली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा राजकीय स्टंट आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी शांत राहावं, कायदा हातात घेऊ नये असं आवाहन थोरात यांनी केलंय.
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. वाकचौरेंच्या प्रवेशामुळे शिवसैनिकांनी त्यांना मारहाण झाली होती. ही मारहाण भाऊसाहेब हसे यानेच केली होती. मात्रही शाईफेक का केली हे मात्र कळू शकलं नाही.
Follow @ibnlokmattv |